Home Featured दीपक पाऊसकरांसह5 जणांविरुद्ध आरोपपत्र

दीपक पाऊसकरांसह5 जणांविरुद्ध आरोपपत्र

0

मिराबाग-सावर्डे येथील बंधाऱ्याच्या विषयावरून गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीत उभे राहून आंदोलकांनी फलक उंचावून घोषणाबाजी केल्या प्रकरणात पर्वरी पोलिसांनी माजी मंत्री दीपक पाऊसकर यांच्यासह पाच जणांच्या विरोधात 300 पानांचे आरोपपत्र म्हापसा येथील न्यायालयात दाखल केले आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये 30 जणांच्या साक्षी नोंदवून घेतल्या आहेत.

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 6 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता प्रश्नोत्तराच्या तासावेळी ही घटना घडली होती. या प्रकरणात माजी मंत्री दीपक पाऊसकर यांच्यासह हेमंत भंडारी, उमेश नाईक, उपेंद्र नाईक आणि आपा नाईक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणामध्ये पर्वरी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. तसेच, माजी मंत्री दीपक पाऊसकर यांचीही चौकशी केली होती.

या प्रकरणातील संशयित आरोपींना विधानसभेत प्रवेश करण्यासाठी आमदार विजय सरदेसाई यांनी पास दिले होते. सभापतींनी या प्रकरणात सरदेसाई यांच्यावर ठपका ठेवून त्यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांनी विधानसभेत जाहीर माफी मागतली होती.