Home Featured जप्त केलेले 14 पैकी 4ट्रॉलर्स जेटीवरून गायब

जप्त केलेले 14 पैकी 4ट्रॉलर्स जेटीवरून गायब

0

गोव्याच्या हद्दीत बेकायदा मासेमारी करताना बुधवारी पकडण्यात आलेल्या 14 ट्रॉलर्सपैकी 4 ट्रॉलर्स गायब झाल्याचे काल आढळून आले. पणजी येथील मत्स्योद्योग खात्याच्या कार्यालयाजवळील जेटीवर जप्त केलेले काही ट्रॉलर्स दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले होते. त्यातील 4 ट्रॉलर्स गायब झाल्याचे आढळून आले. बेकायदा मासेमारी प्रकरणी जप्त केलेल्या ट्रॉलर्सची कागदपत्रे मत्स्योद्योग खात्याने ताब्यात घेतलेली आहेत. गायब झालेल्या त्या ट्रॉलर्सच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली जाणार आहे, अशी माहिती मत्स्योद्योग खात्याच्या संचालिका शमिला मोंतेरो यांनी काल दिली.