Home बातम्या ‘मानवाधिकार’च्याअध्यक्षपदी देशपांडे

‘मानवाधिकार’च्याअध्यक्षपदी देशपांडे

0

गोवा राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश भरत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने गोवा राज्य मानवाधिकार आयोगावर सदस्य म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्टा आणि निवृत्त न्यायाधीश प्रमोद व्ही. कामत यांची नियुक्ती केली होती. त्यातील कार्यकारी अध्यक्षपदाचा ताबा निवृत्त न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्टा यांच्याकडे सुपूर्द केला होता.