Home बातम्या महिला आरक्षणच्या समर्थनासाठीमोदींनी लिहिलेे सर्व पक्षांना पत्र

महिला आरक्षणच्या समर्थनासाठीमोदींनी लिहिलेे सर्व पक्षांना पत्र

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ला पाठिंबा मागितला. पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्रात हा कायदा संपूर्ण देशात खऱ्या अर्थाने लागू होण्याची वेळ आली आहे. 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महिलांसाठी आरक्षणासह घेतल्या जाव्यात. महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व देण्याची इच्छा सर्व पक्षांनी दीर्घकाळापासून व्यक्त केली आहे ती वेळ आता आली आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मलिल्कार्जुन खरगे यांनी या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी आणि परिसीमनशी संबंधित मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा केली जावी अशीही मागणी केली आहे.