Home बातम्या ‘त्या’ आव्हान याचिकेवर आज निकाल शक्य

‘त्या’ आव्हान याचिकेवर आज निकाल शक्य

0

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून फोंडा पोटनिवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निवाडा सोमवारी जाहीर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र काल निवाडा जाहीर झाला नाही. आता, मंगळवारी निवाडा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पोटनिवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवरील सुनावणी गुरुवारी पूर्ण होऊन निवाडा राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या याचिकांवरील निवाडा सोमवारी जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार सदस्याचा शिल्लक असलेला कार्यकाळ एक वर्षापेक्षा कमी असल्यास पोटनिवडणूक घेणे बंधनकारक नाही. गोवा विधानसभेचा कार्यकाळ मार्च 2027 मध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या आमदाराचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा कमी असणार आहे. असा दावा करून ही पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.