Home Featured ताळगाव अपघातातदुचाकीचालकाचा मृत्यू

ताळगाव अपघातातदुचाकीचालकाचा मृत्यू

0

ताळगाव-सांताक्रूझ पठारावरील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमजवळील धोकादायक रस्ता क्रॉसिंगवर काल सकाळी 11.30 च्या सुमारास कारगाडी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक संतोष पालकर (50, रा. ओशेल) यांचा मृत्यू झाला. या अपघातात संतोष पालकर गंभीर जखमी झाले होते. आगशी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या अपघात प्रकरणामध्ये कारचालकाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.