Home बातम्या चंदिगडमधील भाजपच्या मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला

चंदिगडमधील भाजपच्या मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला

0

चंदीगडमधील सेक्टर-37 येथील पंजाब भाजपच्या मुख्यालयाबाहेर बुधवारी स्फोट झाला होता. मात्र या स्फोटाचे कारण उघड झाले नव्हते. या स्फोटाचे 2 नवीन व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात हा ग्रनेड हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये भाजप कार्यालयाजवळ असलेल्या दुसऱ्या एका कार्यालयाबाहेर 2 संशयित उभे असलेले दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतर दोन्ही संशयित रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळून जाताना कैद झाले आहेत.

बुधवारी संध्याकाळी पंजाब भाजपच्या मुख्यालयाबाहेर स्फोट झाला होता. यामुळे घटनास्थळी उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आणि आजूबाजूच्या भिंतींवर छऱ्यांचे निशाण उमटले. या घटनेचे 2 व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यापैकी एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ग्रेनेड बॉम्ब फेकताना दिसला. तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाईकवरून जाणारे दोन लोक दिसले, ज्यांना हल्लेखोर म्हटले जात आहे.

याचबरोबर, सोशल मीडियावर एक पोस्ट देखील व्हायरल झाली, ज्यात या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी संघटनेने घेतली. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी कोणलाही अटक केलेली नाही. चंदीगडच्या एसएसपी कंवरदीप कौर यांनी सांगितले होते की, क्रूडसारखी वस्तू फेकण्यात आली आहे. चंदीगड पोलीस आणि सीएफएसएलची टीम भाजप कार्यालयाबाहेर तपास करत आहेत.