फोंडा येथील दामोदर रायकर यांच्या सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या प्रतीक्षा शिंदे (रा. सावईवेरे) आणी जिया शिगावकर (रा. वाजे-शिरोडा) या कामगारांनी 1,14,66,782 रुपये किमतीचे अंदाजे 695.080 ग्रॅम सोन्याच्या दागिन्याची अफरातफर केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी निरीक्षक मोहन गावडे अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 6-7 वर्षांपासून सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या संशयित कामगारांनी दुकानातील दागिन्यांची अफरातफर केल्याचे मालकाच्या नजरेस दिसून आले. दुकानमालकाने या प्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही युवतींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.