देशात पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता नाही, परंतु स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यामुळे एलपीजी आपल्यासाठी चिंतेचा विषय बनला असल्याचे भारत सरकारने काल शुक्रवारी सांगितले. इराणमधील युद्धामुळे देशात गॅस बुकिंगच्या संख्येत सुमारे 20 लाखांनी वाढ झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सरकारच्या वतीने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी, युद्धापूर्वी दररोज सरासरी 55.7 लाख सिलिंडरची बुकिंग होत होती. सध्या एका दिवसात सुमारे 75.7 लाख गॅस बुकिंग होत आहेत. युद्धाच्या वातावरणात एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगमध्ये अचानक वाढ दिसून आली आहे. हे लोकांमध्ये असलेल्या घबराटीमुळे होत असल्याचे सांगितले.
वितरकांकडे गॅसचा साठा
पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी हा चिंतेचा विषय आहे कारण देशातील बहुतेक एलपीजी स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून येतो आणि तो सध्या बंद आहे. तथापि, आमच्या 25,000 एलपीजी वितरकांपैकी कोणाकडेही गॅस संपल्याची कोणतीही तक्रार मिळालेली नाही असे स्पष्ट केले. की एलपीजीची घाबरून बुकिंग करण्याची गरज नाही, कारण कोणत्याही एलपीजी डीलरकडे गॅस संपल्याची परिस्थिती समोर आलेली नाही. 9 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या नैसर्गिक वायू आदेशानुसार अनेक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याच आदेशानुसार घरगुती पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा कोणत्याही कपातीशिवाय सुरू आहे.
सरकारच्या मते, भारताकडे कच्च्या तेलासाठी 258 दशलक्ष मेट्रिक टन शुद्धीकरण क्षमता आहे. सर्व रिफायनरीज सध्या 100% किंवा त्याहून अधिक क्षमतेने कार्यरत आहेत.
रिफायनरीजकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि याव्यतिरिक्त पुरवठा सातत्याने सुरू आहे.