नववर्ष स्वागत समीती म्हापसातर्फे आयोजित 23 वी सावजनिक गुढी पाडवा उत्सवाची रुपरेषा ठरविण्यासाठी आज मंगळवार दि. 24 फेब्रुवारी रोजी रात्रौ 7.30वाजता खोर्ली म्हापसा येथील श्री देवी सातेरी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे. तसेच विविध समित्यांना जबाबदारी देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी ह्या बैठकीला उपस्थित रहावे असे कार्यकारी समितीने कळविले