बांगलादेशमध्ये सत्ता पालट झाल्यानंतर आता देशभर बंद पडलेली ‘अवामी लीग’ या पक्षाची कार्यालये पुन्हा उघडण्यास सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावे लागल्यानंतर ज्या कार्यालयांवर हल्ले झाले होते आणि जिथे टाळी ठोकली होती, तिथे आता पुन्हा अवामी लीगचे कार्यकर्ते दिसू लागले आहेत. दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपीने मोठा विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीत अवामी लीगवर बंदी असल्याने त्यांनी सहभाग घेतला नव्हता.