Home बातम्या ओडिशा येथील अपघातात5 पोलिसांचा मृत्यू, 3 गंभीर

ओडिशा येथील अपघातात5 पोलिसांचा मृत्यू, 3 गंभीर

0

ओडिशातील झारसुगुडा येथे ट्रेलर आणि पोलीस गाडीची धडक झाली. या घटनेत 5 पोलिसांचा मृत्यू झाला. 3 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी पहाटे 4 वाजता झारसुगुडा सदर पोलीस ठाण्याजवळ झाला. पोलीस कर्मचारी गस्तीवर निघाले होते, त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने त्यांच्या गाडीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, पोलिसांची बोलेरो गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे जखमी पोलीस कर्मचारी त्यातच अडकले होते. पोलीस आणि स्थानिक लोकांनी जखमींना बाहेर काढले होते. जखमीं तिघांवर झारसुगुडा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, परंतु त्यांची प्रकृती गंभीर आहे. ट्रेलर चालक ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू आहे.