Home Featured आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीखाली बोगदा

आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीखाली बोगदा

0

रस्ता व रेलमार्ग असलेला देशातील पहिला प्रकल्प

आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीखाली भारतातील पहिला रस्ता व रेलमार्ग असलेला बोगदा तयार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. याची एकूण किंमत 18,662 कोटी असेल. हा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा अंडरवॉटर रोड-कम-रेल बोगदा प्रकल्प असेल, ज्यात एकाच बोगद्यात रस्ता आणि रेल्वे मार्ग असेल. ट्रेन आणि गाड्या एकाच वेळी धावतील. हा प्रकल्प इंजिनिअरिंग-प्रोक्युअरमेंट-कन्स्ट्रक्शन मॉडेलवर विकसित केला जाईल.

या प्रकल्पांतर्गत गोहपूर ते नुमालीगड दरम्यान 15.79 किमी लांबीचा बोगदा बांधला जाईल. सध्या नुमालीगड आणि गोहपूर दरम्यान सुमारे 240 किमी अंतर कापायला 6 तास लागतात. या प्रकल्पामुळे कमी वेळ लागेल.

बोगद्यामुळे होणारे फायदे
हा बोगदा प्रकल्प पूर्ण झाला की त्याचे विविध फायदे होणार आहेत. त्यात आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडसह ईशान्येकडील राज्यांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभेल. 4 प्रमुख रेल्वे स्थानके, 2 विमानतळ आणि 2 जलमार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. या बोगद्यामुळे सुमारे 80 लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
चॅनल टनेल हा जगातील एकमेव अंडरवॉटर रोड-कम-रेल बोगदा आहे. इंग्लिश चॅनेलच्या खाली बांधलेला हा बोगदा युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सला जोडतो. हा बोगदा 1994 मध्ये जनतेसाठी खुला करण्यात आला. बोगद्याची एकूण लांबी अंदाजे 50.45 किलोमीटर आहे, ज्यापैकी अंदाजे 37.9 किलोमीटर पाण्याखाली आहे. हा जगातील सर्वात लांब पाण्याखालील बोगद्यांपैकी एक आहे.