Home बातम्या लुथरा बंधूंचाजामीन फेटाळला

लुथरा बंधूंचाजामीन फेटाळला

0

म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बर्च नाईटक्लब अग्नितांडव प्रकरणात बर्चचे मालक सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूंचा जामीन अर्ज काल फेटाळला. बर्च या नाईटक्लबला 6 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत 25 जणांचा बळी गेला होता. या प्रकरणात क्लबचे मालक लुथरा बंधूंना अटक करण्यात आली होती. सौरभ व गौरव हे लुथरा बंधू सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर आणि अशिलांसोबत चर्चा केल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे लुथरा बंधूंच्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.