Home बातम्या वाहतूक सेवांमधीलसंपावर बंदी लागू

वाहतूक सेवांमधीलसंपावर बंदी लागू

0

राज्य सरकारने राज्यभरात प्रवासी किंवा माल वाहतुकीशी संबंधित सर्व वाहतूक सेवांमध्ये कोणत्याही स्वरूपात संपावर तात्काळ बंदी घातली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने गोवा अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (एस्मा) अंतर्गत गेल्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ही बंदी लागू होते. राज्यातील वाहतूक सेवा सुनिश्चित करण्यासाठी आणि सार्वजनिक सोयीसुविधांचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. आदेश जारी झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी संपावरील बंदी लागू राहणार आहे.