चिंबल ग्रामस्थांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
तंभ या प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळ द्यावा, यासाठी गेली काही दिवस प्रयत्न केला जात आहे; मात्र बैठकीसाठी प्रतिसाद मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांसोबत बैठकीसाठी 7 फेब्रुवारीपर्यंत वेळ द्यावा; अन्यथा या दोन्ही प्रकल्पांविरोधातील आंदोलनाबाबत पुढील कृतीची घोषणा रविवार 8 फेब्रुवारीला केली जाणार आहे, अशी माहिती चिंबल ग्रामस्थांचे एक नेते अजय खोलकर यांनी काल दिली.
चिंबल ग्रामस्थांचे दोन्ही प्रकल्पांविरोधात मागील 41 दिवस साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. पर्यटन खात्याने हे दोन्ही प्रकल्प हलविण्याचे जाहीर केले आहे. मात्र अधिकृत पत्र अजूनपर्यंत दिलेले नाही. त्यामुळे आंदोलन अजूनही सुरू आहे.