कुजिरा, बांबोळी येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 7 फेब्रुवारी रोजी संध्या. 6 वा. कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त ‘संघ शताब्दी व पंच परिवर्तन’ या महानाट्याचे सादरीकरण होणार आहे. हे महानाट्य राष्ट्रसेवा, संघटन व आत्मविकास या मूल्यांवर आधारित आहे. या महानाट्यात शाळेचे 452 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक व शाळेचे नाट्य शिक्षक जय हळदणकर यांचे या महानाट्याला दिग्दर्शन लाभले आहे. यावेळी 2024-25 शैक्षणिक वर्षातील 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रमुख राजेंद्र भोबे व अध्यक्षस्थानी डॉ. के. ब. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष देसाई, हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास सतरकर उपस्थित राहणार आहेत. शाळेचे व्यवस्थापन व पालक शिक्षक संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कलाकृतीचा आनंदानुभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.