Home बातम्या मेटा, व्हॉट्सॲपला‘सर्वोच्च’ फटकार

मेटा, व्हॉट्सॲपला‘सर्वोच्च’ फटकार

0

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मेटा आणि व्हॉट्सपला त्यांच्या गोपनीयता धोरणावरून जोरदार फटकारले. आम्ही तुम्हाला एकही माहिती शेअर करण्याची परवानगी देणार नाही. तुम्ही या देशाच्या अधिकारांशी खेळू शकत नाही. जर तुम्ही आमच्या संविधानाचे पालन करू शकत नसाल, तर भारत सोडून द्या. आम्ही नागरिकांच्या गोपनीयतेशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. हे प्रकरण व्हॉट्सॲपच्या 2021 च्या गोपनीयता धोरणाशी संबंधित आहे, ज्यामध्ये भारतीय स्पर्धा आयोगाने नोव्हेंबर 2024 मध्ये मेटावर 213.14 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. या प्रकरणात न्यायालय 9 फेब्रुवारी रोजी अंतरिम आदेश देईल.