Home बातम्या तुयेचे शासकीय रुग्णालय वसंशोधन केंद्र गोमेकॉशी लिंक

तुयेचे शासकीय रुग्णालय वसंशोधन केंद्र गोमेकॉशी लिंक

0

उत्तर गोव्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, सरकारने तुये येथील नव्याने स्थापन झालेले रुग्णालय बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी (गोमेकॉ) संलग्न सुविधा म्हणून घोषित केले आहे. यापुढे हे इस्पितळ ‘शासकीय रुग्णालय आणि संशोधन केंद्र, तुये (जीएमसी लिंक)’ या नावाने ओळखली जाईल. या नवीन इस्पितळातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या डॉक्टरांकडून दि. 2 फेब्रुवारीपासून खालीलप्रमाणे सुरू होतील. जनरल मेडिसिनसाठी डॉ. सागर एस., शस्त्रक्रियेसाठी डॉ. वरुण शेट्टी आणि अस्थिरोग विभागासाठी डॉ. साईल खोर्जुवेकर हे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी उपलब्ध असतील. स्त्रीरोग विभागासाठी डॉ. रुक्मा प्रभू ह्या गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी, तर डॉ. रुपमा साळगावकर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी उपलब्ध असतील. दंतवैद्य डॉ. मनस्वी आळवे, बालरोगतज्ञ डॉ. सोनाली कुटे आणि फिजिओथेरपिस्ट निकिता साटेलकर ह्या दररोज उपलब्ध असतील.नेत्ररोगतज्ञ डॉ. अश्विन डिसोझा शनिवारी उपलब्ध असतील. आयुष विभागाचे डॉ. अजित माटकर हे मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उपलब्ध असतील. मानसोपचारतज्ञ डॉ. योगीराज आनंद आणि कान, नाक, घसा (ईएनटी) तज्ञ डॉ. साईनाथ पेडणेकर हे सोमवार आणि शुक्रवारी उपलब्ध असतील. रेडिओलॉजिस्ट डॉ. मोहिनी सरदेसाई ह्या बुधवारी उपलब्ध असतील. त्वचाविज्ञान, वेनेरिओलॉजी आणि कुष्ठरोग विभागाचे कामकाज डॉ. यास्मिन नदाफ मंगळवारी पाहतील.