Home Featured ‘त्या’ रशियन महिलांचे खून प्रेम व पैशांसाठी

‘त्या’ रशियन महिलांचे खून प्रेम व पैशांसाठी

0

मोरजी व हरमलमध्ये खून

मोरजी व हरमलमध्ये खून

प्रेमसंबंध जुळवून करायचा पैशांची मागणी

मोरजी व हरमल या दोन ठिकाणी आलेक्सेई लिओनोव्ह या पर्यटकाने रशियन नागरिकाने दोन रशियन महिलांचा केलेला खून पैशांसाठी व प्रेमसंबंधामुळे केल्याचे उघड झाले आहे. सदर रशियन नागरिकाने आणखी खून केले आहेत का याचा तपास मांद्रे पोलीस करत आहेत. संशयिताने अनेक महिलांचा खून केल्याचा दावा केलेला असला, तरी अद्याप मांद्रे पोलिसांनी याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हरमल बामन भाटी या एका भाड्याच्या खोलीमध्ये आलेक्सेई लिओनोव्ह या पर्यटकाने एलिना कास्तानोव्हा या सदतीस वर्षीय महिलेचा गळा चिरून खून केला होता. त्यासंबंधीची तक्रार घरमालक उत्तम नाईक यांनी मांद्रे पोलिसांत दिली होती. त्याच दिवशी मोरजी मधलावाडा येथे एलिना वानिव्हा या 37 वर्षीय आणखी एका महिलेचा बाथरूममध्ये गळा चिरून नग्न अवस्थेमध्ये खून करण्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयित आलेक्सेई लिओनोव्ह या रशियन पर्यटकाला तातडीने ताब्यात घेऊन अटकही केली. संशयित आलेक्सेई याला मांद्रे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची जबानी घेतली असता तो आपली जबानी बदल असल्याचे पोलिसांना आडलून आले. त्यामुळे त्याने नक्की किती खून केले आहेत? याचा तपास मांद्रे पोलीस करत आहेत.
संशयित आलेक्सेई लिओनोव्ह हा रशियन महिलांसोबत सुरुवातीला प्रेमसंबंध जुळवत असे. त्या महिला प्रेमात पडल्यानंतर तिचा विश्वास संपादन करत असे. सदर महिलेचे दुसऱ्याशी संबंध असेल तर संशयित आलेक्सेई लिओनोव्ह हा तिच्यावर प्रेमाचे नाटक करून सहजरित्या तिचे हात मागून घेत असे व नंतर हात बांधून तिच्यावर शारीरिक अत्याचार करून तिचा खून करत असे.
तसेच अशा महिलांकडून पैसे घ्यायचा. जर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला तर रागाच्या भरात तिचा मानसिक छळ करण्याचेही काम संशयित आलेक्सेई लिओनोव्ह करत होता. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

सध्या मांद्रे पोलीस स्थानकावर गृहखात्याचे वरिष्ठ अधिकारी येऊन या प्रकरणांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक, उपअधीक्षकांना वेगवेगळ्या सूचना करून संशयिताने आणखी हत्या केली आहे का? केल्या तर किती केल्या याता तपास सुरू आहे. संशयित आलेक्सेई लिओनोव्ह हा जबान्या बदलत असल्यामुळे तपास करताना पोलिसांना कशा प्रकारच्या अडचणी येतात याचाही तपास हे अधिकारी करत आहेत. पेडणे तालुक्यात या खुनाविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू असून या खुनाचा परिणाम पर्यटनावरही होत असल्याचे दिसून आले. काही पर्यटक भयभीत झाले असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी रशियन पर्यटक वास्तव्य करून राहतात, त्या घरमालकांचेही धाबे दणाणलेले आहेत. पोलीस आपल्या दृष्टीने तपास कार्य करत आहेत. या रशियन नागरिकांनी आणखी हत्या केली की काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.

महिलांचे मृतदेह ताब्यात

या संबंधी मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेन्द्र नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, संशयिताने दोघांचा खून केल्याची कबुली दिल्यानंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. आलेक्सेई लिओनोव्ह या पर्यटकाने आणखी असे खून केले असतील तर त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. याबाबत योग्य पुरावे सादर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना योग्य ती माहिती वरिष्ठ अधिकारी देतील. आलेक्सेई लिओनोव्ह याने सध्या दोनच खुनांची कबुली दिली असून ते दोन्ही मृतदेह सापडले असल्याचे पोलीस निरीक्षक गिरेन्द्र नाईक यांनी सांगितले.

14 दिवसांची पोलीस कोठडी

हरमल येथे रशियन महिलेचा गळा चिरून खून केल्यानंतर मांद्रे पोलिसांनी आलेक्सेई लिओनोव्ह याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 14 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पेडणे तालुक्यात खळबळ

रशियन पर्यटकांनी रशियन महिलांची हत्या केल्यामुळे गोव्यात सध्या खळबळ माजलेली आहे. या मर्डर किलर पर्यटक अधून मधून वेगवेगळ्या जबान्या बदलत असल्यामुळे पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय तो जबान्या बदलत असून दोनच नव्हे तर अनेक खून केल्याची माहिती खात्रीलायक सूत्राने प्रसार माध्यमातून पोहोचवली त्यामुळे आणखी खळबळ माजलेली आहे.