Home Featured राष्ट्रपती मुर्मूंनी केला पाणबुडीतून प्रवास

राष्ट्रपती मुर्मूंनी केला पाणबुडीतून प्रवास

0

कारवार येथील नौदलाच्या तळावरून आयएनएस वाघशीर पाणबुडीतून प्रवास

पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आलेेल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रविवारी नौदलाच्या कारवार (कर्नाटक) येथील तळावरून भारतीय नौदलाच्या देशी बनावटीच्या कलवरी वर्गातील आयएनएस वाघशीर पाणबुडीतून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत नाविक दलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा कलवरी वर्गाच्या पाणबुडीतून झालेला हा पहिलाच प्रवास होता. मात्र, या वर्गाच्या पाणबुडीतून यापूर्वी भारताचे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीही प्रवास केला होता आणि या वर्गाच्या पाणबुडीतून प्रवास करणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले होते. आता द्रौपदी मुर्मू ह्या वर्गाच्या पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शनिवारी गोवा दौऱ्यावर आगमन झाले होते. बहुराज्यीय दौऱ्यासाठी त्या गोव्यात दाखल झाल्या होत्या. वास्को येथील आयएनएस हंसा तळावर भारतीय नौदलाच्या तुकडीने त्यांना मानवंदना देऊन त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी राष्ट्रपतींनी जवानांच्या संचलनाचे निरीक्षणही केले. त्याचबरोबर राष्ट्रपती मुर्मू यांनी काल स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर समुद्रात बहुक्षेत्रीय नौदल कवायतींची पाहणी केली.

लढाऊ विमानांमध्येही राष्ट्रपतींनी केले उड्डाण
द्रौपदी मुर्मू या भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांमध्ये उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. त्यांनी या वर्षी 29 ऑक्टोबर रोजी राफेलमध्ये आणि 2023 मध्ये सुखोई 30 मध्ये उड्डाण केले.

पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या श्रीमती मुर्मू दुसऱ्या राष्ट्रपती

भारताच्या राष्ट्रपती आणि सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी कारवार नौदल तळावरून भारतीय नौदलाच्या स्वदेशी विकसित कलवरी-श्रेणी पाणबुडी, आयएनएस वागशीरवर पश्चिम समुद्रकिनारी ऐतिहासिक प्रवास केला. या महत्त्वपूर्ण प्रसंगी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी राष्ट्रपतींसोबत होते. कलवरी-श्रेणी पाणबुडीवर प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. कोणत्याही राष्ट्रपतींनी केलेला हा दुसरा पाणबुडी प्रवास आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीमुळे भारतीय नौदलाचे धाडस, तांत्रिक कार्यक्षमता आणि व्यावसायिक वचनबद्धता वाढेल. यामुळे सर्वोच्च नेतृत्वाचा सशस्त्र दलांना असलेला आत्मविश्वास आणि पाठिंबा आणखी दृढ होतो.

पाणबुडीचे ठळक वैशिष्ट्य

आयएनएस वागशीर ही प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधलेली अत्याधुनिक, कलवरी-श्रेणी डिझेल-इलेक्ट्रिक हल्ला पाणबुडी आहे. ही भारतीय नौदलाच्या पाणबुडी क्षमतेचे, आत्मनिर्भर भारताचे आणि मेक इन इंडिया उपक्रमांचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. ही पाणबुडी समुद्राखालील गुप्त ऑपरेशन्स, पाळत ठेवणे, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि शत्रूच्या जहाजे आणि पाणबुड्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यास सक्षम आहे.
पाण्याच्या पृष्ठभागावर हिचा वेग 20 किलोमीटर प्रतितास तर पाण्याखाली ही 37 किलोमीटर प्रतितास आहे. याची रेंज गतीनुसार ठरते. जर हा पृष्ठभागावर 15 किलोमीटर प्रतितास वेगाने चालत असेल, तर ती 12 हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. पाण्याखाली ही 1020 किलोमीटरच्या रेंजपर्यंत जाऊ शकते, परंतु वेग 7.4 किलोमीटर प्रतितास असावा लागतो. ही कलवरी क्लास पाणबुडी आहे. या क्लासच्या पाणबुड्यांची लांबी अंदाजे 221 फूट, बीम 20 फूट आणि उंची 40 फूट असते.

डॉ. कलाम यांचा प्रवास

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम हे पाणबुडीतून प्रवास करणारे पहिले राष्ट्रप्रमुख बनले. 13 फेब्रुवारी 2006 रोजी, डॉ. कलाम यांनी बंगालच्या उपसागरातील पूर्व नौदल कमांड अंतर्गत असलेल्या विशाखापट्टणम येथे पाणबुडीवर अनेक तास घालवले. त्यांच्यासोबत तत्कालीन नौदल प्रमुख अरुण प्रकाश होते. या पाणबुडीचे नेतृत्व कमांडर पीएस बिश्त यांनी केले होते. या भेटीनंतर, डॉ. कलाम म्हणाले, पाण्याखालील पाणबुडीतून प्रवास करण्याचा हा माझा पहिला अनुभव होता. भारतीय नौदलाची ही मूक सेना पाण्याखाली कशी काम करते हे मला कळले.