हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांत गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले. एसआयआरवर तात्काळ चर्चा व्हावी यासाठी विरोधकांनी आग्रह धरला आहे. आता लोकसभेत मंगळवार दि. 9 डिसेंबर रोजी एसआयआरवर चर्चा होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते के. सुरेश यांनी ही माहिती दिली. एसआयआवर 10 तास चर्चा होईल.