Home Featured सांताक्रुझ चोरीप्रकरणी, संशयितास अटक

सांताक्रुझ चोरीप्रकरणी, संशयितास अटक

0

उबो दांडो, सांताक्रूझ येथील एका फ्लॅटमधील सुमारे 25 लाख रुपयांच्या रोख आणि सोन्याच्या चोरीच्या प्रकरणातील संशयित आरोपी लोकेश सुतार (33) याला जुने गोवा पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत कर्नाटक राज्यात अटक करून गोव्यात आणले आहे.
संशयित लोकेश याला 10 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिली. ही चोरीची घटना 14 नोव्हेंबरला दिवसाढवळ्या झाली होती. संशयित आरोपी लोकेश हा सराईत गुन्हेगार असून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.