लडाखच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारशी चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे. बुधवार दि. 22 ऑक्टोबर रोजी दिल्लीत ही चर्चा होईल. 24 सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दोन्ही बाजू आमनेसामने आहेत. मागील चर्चा मे महिन्यात झाल्या होत्या. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या उपसमितीसोबत चर्चा केली जाईल, असे लेह एपेक्स बॉडीचे सह-अध्यक्ष चेरिंग दोर्जे लाक्रुक म्हणाले. या बैठकीला एलएबी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) चे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, लडाखचे खासदार मोहम्मद हनीफा जान आणि त्यांचे वकील उपस्थित राहतील.