राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय झालेला असून पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच राज्यात पाऊस सक्रीय झाला होता. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. पुढील दोन-तीन दिवसही राज्यात अशाच प्रकारची स्थिती राहणार आहे.
काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, काल दुपारी पणजी, मडगाव आदी शहरांसह राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळला. शनिवारीही राजधानीसह काही शहरात व ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या होत्या. शनिवारपासून राज्यात संपूर्ण ढगाळ वातावरण होते.