पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख उत्तर दिल्यानंतरही पाकिस्तानचा तोरा कायम आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला असून, भारत ज्याला दहशतवाद म्हणतो तो ‘कायदेशीर संघर्ष’ आहे, असे वक्तव्य केले आहे. याचबरोबर, काश्मिरी लोकांना राजकीय, राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा पाकिस्तान देत राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.असीम मुनीर यांनी पाकिस्तान नौदल अकादमीतील पासिंग आऊट परेडला संबोधित करताना हे विधान केले. भारताने पाकिस्तानविरुद्ध दोनदा विनाकारण आक्रमण केले आहे. भविष्यात होणाऱ्या आक्रमणाची जबाबदारी पूर्णपणे आक्रमण करणाऱ्यावर असेल, असेही मुनीर म्हणाले.