जीवन संस्कार- 11
- प्रा. रमेश सप्रे
परमेश्वराशी एकरूप होणं म्हणजेच शाश्वत मुक्ती मिळवणं ज्यांना साध्य करायचंय त्यांनी त्याची तयारी मृत्यूपूर्वी म्हणजे जिवंत असतानाच करायला हवी. अशा व्यक्तींचा ज्ञान-कर्म-भक्ती याविषयींचा म्हणजेच एकूण आध्यात्मिक अधिकार फार वरच्या दर्जाचा असतो.
जीवनाच्या विविध अवस्थांमधील संस्कार पाहताना आपण बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतच्या संस्कारांवर सहचिंतन केले. या विषयावर अजूनही अनेक प्रकारचे चिंतन केले जाऊ शकते. जगातील सर्व संस्कृतींमध्ये- साहित्यकला यांच्या मौलिक वारशाचा एक भाग म्हणून जीवन-मृत्यू या जोडविषयावर विपुल चिंतन-लेखन-सादरीकरण केले गेलेय. अजूनही केले जातेय.
अशा जीवनचिंतनपर ग्रंथांचा मुकुटमणी अर्थातच श्रीमद् भगवद्गीता! ज्या क्षेत्रात नि ज्या प्रसंगी गीता सांगितली गेली ते होतं रणक्षेत्र नि समरप्रसंग. म्हणजे एका अर्थी सारं जीवनच. जीवनासंबंधीचं अर्थपूर्ण प्रतीक किंवा ध्येय या दृष्टीनं गीता मृत्यूकडे पाहते.
एक फार अर्थपूर्ण नि चिंतनीय वाक्य आहे. सर्व जिवांच्या शरीराला त्वचा (कातडी) जशी व्यापून आहे तसा मृत्यू साऱ्या जीवनाला व्यापून आहे. खरंच आहे हे! मातेच्या गर्भाशयातील जन्मपूर्व अस्तित्वापासून ते अखेरच्या श्वासापर्यंतच नव्हे तर त्यानंतरही मृत्यू आपल्या नि आपल्या संबंधितांच्या जीवनाला व्यापून असतो. आणि याचे विविध टप्प्यांवर निरनिराळे संस्कार असतात.
गीतेतील या विषयीचं चिंतन अनेक अध्यायांत आहे. अ. 2, अ. 8, अ. 15 यांत विशेष वर्णन आहे.
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णानि
न्यन्यानि संयाति नवानि देही॥2.22॥
जसे आपण (माणूस) जीर्ण झालेली (फाटलेली) वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो तसेच जीवात्मा (आत्मा) जीर्ण झालेली शरीरं त्यागून नवी शरीरे धारण करतो म्हणजे नवा जन्म घेतो.
यात अभिप्रेत असलेली पूर्वजन्म-पुनर्जन्म ही कल्पना अनेकांना मान्य नसली तरी एरव्ही भयावह वाटणाऱ्या मृत्यूला आनंदानं सामोरं जाण्यासाठी एक नवा विचार, एक नवी दृष्टी गीता आपल्याला जरूर देते.
आठव्या अध्यायात एका सुंदर रूपकाद्वारे मृत्यूची कल्पना (खरं तर वास्तव किंवा सत्यस्थिती) स्पष्ट केली आहे.
अग्निः ज्योतिः अहः शुक्लः
षण्मासा उत्तरायणम्।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥9।24॥
याचा अर्थ- ज्योती म्हणजे प्रकाश, अग्नी (ऊर्जा), शुक्ल पक्ष, उत्तरायणाचे सहा महिने असलेल्या काळात जो मृत्यू पावतो तो मुक्त होतो (ब्रह्माला प्राप्त होतो). त्याला पुनर्जन्म नाही. याउलट-
धूमो रात्रिः तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्।
तत्र चांद्रमसं ज्योतिर्येागी प्राप्य निवर्तते॥8।25॥
(ज्या वेळी) धूर (आकाशात पसरलेला धूर किंवा अंधार), रात्र, कृष्ण (वद्य) पक्ष अन् दक्षिणायनास सहा महिने चालू आहेत, त्यावेळी जो मृत्यू पावतो तो स्वर्गात जाऊन आपल्या पुण्यकर्माचे फळ भोगून पुन्हा मृत्युलोकांत जन्म घेतो. (असा जीव (व्यक्ती) मृत्यूनंतर मुक्त होत नाही.)
या मृत्यूविषयी वर्णन असलेल्या दोन श्लोकांत भगवंत अर्जुनाला शुक्ल- कृष्ण पक्ष, उत्तरायण-दक्षिणायन अशा पंचांगातील गोष्टी सांगत नाहीयेत, तर मृत्यूसमयी देह-मनाची स्थिती मुक्तीसाठी कशी असावी आणि जन्म-मृत्यू-जन्म-मृत्यू या चक्रात दीर्घकाळ राहणं कसं (का) चुकवायचं याचं वर्णन आहे.
इथं मृत्यूसंबंधी संस्कारांचा विचार फार सूचकपणे केला गेलाय. दिवस, प्रकाश, ऊर्जा (शक्ती), शुक्ल पक्ष म्हणजे वाढता चंद्रप्रकाश (चंद्राचा अमावस्येकडून पौर्णिमेकडचा प्रवास) नि उत्तरायण म्हणजे दिवस मोठे होत जाणे म्हणजेच अधिकाधिक कर्म करण्याची प्रेरणा मिळणे हे सारे चित्र जसे मृत्यूसमयीच्या आनंदपूर्ण वातावरणाचे आहे, तसेच ते मृत्यूपूर्वीच्या जीवनासंबंधी, जीवनशैलीविषयी अधिक महत्त्वाचे आहे.
मृत्यूचा स्वीकार मरणाऱ्या व्यक्तीनं तसंच त्याच्याशी संबंधित असलेल्या मंडळींनी म्हणजे नातेवाइकांनी, मित्रांनी, सहकाऱ्यांनी कसा करावा, यात मृत्यूसंबंधीच्या संस्कारांचा पुंज दडलेला आहे. एवढेच नव्हे तर यासाठी मृत्यूकडे सरकताना देह-मन-बुद्धी-कार्य-वासना इ. गोष्टी कशा असाव्यात याविषयी उत्तम मार्गदर्शन आहे. जसजसं आयुष्य संपत जातं, मृत्यू दृष्टिपथात येऊ लागतो किंवा एखाद्या असाध्य व्याधीनं वा अपघातामुळे अचानक, अकाली मृत्यू आला तरी त्याला आनंदानं, धन्यकृतार्थ भावनेनं सामोरं कसं जावं हे सांगताना अनेक संस्कारांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उल्लेख केला गेलाय. ते सारे संस्कार पाहण्यापूर्वी गीतेच्याच पंधराव्या अध्यायातील मृत्यूसंदर्भातील अप्रतिम विचारांवर चिंतन करणे आवश्यक आहे.
परमेश्वराशी एकरूप होणं म्हणजेच शाश्वत (कायमची) मुक्ती मिळवणं ज्यांना साध्य करायचंय त्यांनी त्याची तयारी मृत्यूपूर्वी म्हणजे जिवंत असतानाच करायला हवी. अशा व्यक्तींचा ज्ञान-कर्म-भक्ती याविषयींचा म्हणजेच एकूण आध्यात्मिक अधिकार फार वरच्या दर्जाचा असतो. गीतेतील शब्द अतिशय अर्थपूर्ण आहेत-
निर्मानमोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः।
द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैः गच्छन्तमूढाः पदमव्ययं तत्॥15॥
न तद्भासयेत सूर्यो न शशांको न पावकः।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम॥15॥6॥
जन्म-जीवन-मृत्यू-पुनर्जन्म-मुक्ती अशा गूढ विषयांबद्दल अतिशय स्पष्ट नि तेजस्वी विचार या श्लोकात मांडलेले आहेत.
एका वाक्यात सांगायचं झालं तर आनंददायी मृत्यूसाठी सुफलसंपन्न कसं असावं किंवा कसं वागावं याचं इतकं प्रत्ययकारी विवेचन किंवा मार्गदर्शन क्वचितच कुठल्या ग्रंथात वा पंथात (धर्मात) पाहायला मिळेल. आपण विचार करतोय मृत्यूविषयीच्या संस्कारांबद्दल-
- मृत्यू जन्मलेल्या (आकाराला आलेल्या) प्रत्येक जिवाला (वस्तूला) अटळ आहे. ‘जिवासवे जन्मे मृत्यू’ हे अटळ सत्य आहे. पण त्याहीपेक्षा अमोघ तथ्य आहे- ‘मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा।’
गीतरामायणातील ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या वर वर अगदी सत्य वाटणाऱ्या शब्दांच्या पोटात खरा भावार्थ दडलेला आहे-
पिता-माता-भ्राता कोणीही आपल्या (कर्म)भोगाला जबाबदार नसतात, तर जबाबदार असतात आपली पूर्वकर्मे- म्हणजे आपले आपणच म्हणजे स्वतःच! खरं तर आपले भोग-उपभोग आपल्या ‘स्वाधीन’ असतात. आपल्याच पूर्वकर्मांची फळं आपण भोगत असतो. म्हणूनच आजवरच्या अनुभवानं जाणते (ज्ञानी, परिपक्व) बनून उद्याच्या कर्मफळांच्या प्रसन्न, संपन्न बागा फुलवू या. फळवू या. असो.
- मृत्यूच्या क्षणी असलेली माणसाची मनःस्थिती पुढच्या गतीसाठी (जन्मासाठी) जरी महत्त्वाची मानली नाही तरी ‘अंते मतिः सा गतिः’ हा सिद्धांतही खरा आहेच. पू. गोंदवलेकर महाराज अतिशय प्रभावीपणे सांगतात-
शेवटचा श्वास तर नामात गेला पाहिजेच, पण जीवनात अगदी शेवटची सुटणारी वस्तूही नामच असली पाहिजे.
भगवंत स्वतः गीतेत सांगतात- ‘अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्।’ माझं नाम घेत, माझं स्मरण करत मृत्यूला सामोरं जाण्यासाठी-
…तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च ॥8॥6॥
…तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन॥8।27॥
म्हणजे त्या ईश्वरीशक्तीचं (मूर्तीचं नव्हे!) सतत नाम-ध्यान-अनुसंधान राखत आनंदात मुक्तपणे जगलं पाहिजे. मृत्यू नव्हे मुक्तीचा अनुभव घेतला पाहिजे जसा तो भागवतातील परीक्षितानं घेतला. बघा, विचार नि आचार करून!
ीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत आपल्या शत्रूराष्ट्रांच्या जहाजांना बंदी घालण्याचे. तसे झाल्यास ह्या संघर्षाला वेगळे व व्यापक वळण मिळाल्याशिवाय राहणार नाही. चीन, रशिया या देशांनी इराणवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ट्रम्प यांचे आधल्या दिवशी गोडवे गाणाऱ्या पाकिस्तानवरही ह्या हल्ल्याचा निषेध करण्याची पाळी ओढवली आहे. इराणला ‘दहशतवादाचा पाठीराखा’ संबोधणारे ट्रम्प पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना जेवू घालतात हा अमेरिकेचा दुटप्पीपणा जगजाहीर आहे. अमेरिकेची सहानुभूती मिळवण्याच्या नादात पाकिस्तानने मात्र हकनाक आपले थोबाड फोडून घेतले आहे. शांतिदूत बनायला निघालेले ट्रम्प बघता बघता आपल्या पूर्वसुरींच्या वाटेनेच निघाले आहेत. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष हा इस्रायलसाठी आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याने समजून घेता येतो, परंतु अमेरिकेने इराणला लक्ष्य करण्यामागे केवळ आपल्याला मध्य पूर्वेमध्ये प्रबळ अण्वस्रसज्ज प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये व तेथील सगळे देश आपल्याला अंकित राहावेत हेच आहे. मात्र, आजवर अणूकरारास भाग पाडण्यासाठी इराणपुढे वाटाघाटींचे गुऱ्हाळ मांडले होते. ट्रम्प यांनी थेट आण्विक तळांनाच उद्ध्वस्त करून निर्णायक पाऊल उचलले आहे. ह्या हल्ल्यामुळे किरणोत्सर्ग होऊ शकतो, लाखो लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो वगैरे गोष्टींची तमाही त्यांनी बाळगलेली दिसत नाही. ह्या संघर्षाचे परिणाम काय होतील ह्याबाबत अवघे जग चिंतित आहे. खामेनेई तर आपला काटा काढला गेला तरीही हा संघर्ष सुरू राहावा यासाठी आपले उत्तराधिकारी नेमूनही मोकळे झाले आहेत. अशावेळी हा संघर्ष निवळणार की चिघळणार ही बाब अवघ्या जगासाठी महत्त्वाची आहे.