जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक पर्यटक जखमी झाले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची एनआयएच्या माध्यमातून चौकशी सुरू असून, काल एनआयएने मोठी कारवाई केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना एनआयएने अटक केली आहे. त्या दोघांनी दहशतवाद्यांना आश्रय देत रसद पुरवल्याचा आरोप आहे. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे. ते लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.