Home Featured मोदींनी ठणकावल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा घेतले युद्धविरामाचे श्रेय

मोदींनी ठणकावल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा घेतले युद्धविरामाचे श्रेय

0

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर झालेल्या संभाषणानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या 12 तासांत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य युद्ध थांबवल्याचे श्रेय घेतले. मी भारत-पाक युद्ध थांबवले. मला पाकिस्तान आवडतो. पंतप्रधान मोदी एक अद्भूत व्यक्ती आहेत. मी काल रात्री त्यांच्याशी बोललो. आम्ही भारतासोबत व्यापार करार करू, असे ट्रम्प म्हणाले. मी एक मोठे युद्ध थांबवले, पण कोणीही त्याबद्दल बातमी देखील लिहिली नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. ट्रम्प यांनी भारत-पाक युद्धविरामानंतर आतापर्यंत 15 वेळा त्याचे श्रेय घेतले आहे.
खरे तर, नरेंद्र मोदी यांनी बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली, जी सुमारे 35 मिनिटे चालली होती. यानंतर याविषयी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सविस्तर माहिती दिली होती. चर्चेदरम्यान भारत कधीही कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारत नाही आणि भविष्यातही कधीही स्वीकारणार नाही, असे मोदींनी ट्रम्प यांना सुनावले होते.