गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने चिकोळणा – मुरगाव येथील 43.20 कोटी रुपयांच्या अमलीपदार्थ प्रकरणामध्ये आणखीन एका व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये संशयित म्हणून अहमदाबाद गुजरात येथील चिराग रमेशभाई डुधात (32) याला अटक केली आहे. गेल्या 14 एप्रिल रोजी 43.20 कोटी रुपयांचा कोकेन हा अमलीपदार्थ हस्तगत केला आहे. या प्रकरणामध्ये निबू व्हिन्सेंट, रेश्मा वाडेकर आणि मंगेश वाडेकर या तिघांना अटक केली होती. या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत चारजणांना अटक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित रेश्मा वाडेकर ही विदेशात जाण्यापूर्वी संशयित चिराग याने तिच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. संशयित रेश्मा वाडेकर ही 31 मार्च रोजी विदेशातून नवी दिल्ली येथील विमानतळावर उतरून नंतर गोव्यात आल्याचे उघड झाले आहे.