Home बातम्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

0

महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेशासाठी बारावीमध्ये अनुत्तीर्ण असलेले; परंतु पुरवणी परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी पात्र आहेत. तथापि, त्यांची प्रवेश प्रक्रिया पुरवणी परीक्षेच्या निकालावर अवलंबून असणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्यातील महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीला शुक्रवार दि. 11 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. राज्यातील चाळीस महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइृन पद्धतीने केली जात आहे. उच्च शिक्षण खात्याच्या पोर्टलवर महाविद्यालयीन प्रवेशासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे, असेही सावईकर यांनी सांगितले. बारावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांना प्रमुख शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकत नाही. तथापि, इतर ठिकाणच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाणार आहे, असेही सावईकर यांनी सांगितले.