दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाच्या आणि पक्षातील नेत्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण 1300 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी गृह मंत्रालयाने आपचे नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास मान्यता दिली आहे. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये वर्गखोल्या बांधताना हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 2022 मध्ये दिल्ली सरकारच्या दक्षता आयोगाने कथित घोटाळ्याची चौकशी करण्याची शिफारस केली होती आणि मुख्य सचिवांना अहवाल सादर केला होता. दरम्यान, सिसोदिया आणि जैन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.