रामा काणकोणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

0
2

कुंडई येथील पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य करून भक्तगणांच्या भावना दुखावल्या प्रकरणी पणजी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी पर्वरी येथील श्री खाप्रेश्वर देवस्थानाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावरून रामा काणकोणकर यांनी त्यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होती. यानंतर त्यांच्या भक्तगणांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्याने काणकोणकर हे अडचणीत आले आहेत.