Home Featured आणखी एका ‘ब्रेन डेड’ व्यक्तीमुळे तिघा रुग्णांना जीवदान

आणखी एका ‘ब्रेन डेड’ व्यक्तीमुळे तिघा रुग्णांना जीवदान

0

दोनापावल येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये ‘ब्रेन डेड’ घोषित केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊन काल तिघांना जीवदान दिले.
मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका व्यक्तीला 29 जानेवारी 2025 रोजी ब्रेन डेड घोषित करण्यात आले. डॉ. पारुल दुबे आणि डॉ. स्टेसी यांच्या समुपदेशनानंतर मृत व्यक्तीच्या पत्नीने अवयवदानास संमती दिली. ‘सोट्टो गोवा’ने ज्युपिटर हॉस्पिटल इंदूरमधील रुग्णाला यकृत, तर हेल्थवे हॉस्पिटल आणि गोमेकॉमधील प्रत्येकी एका रुग्णाला मूत्रपिंड देण्यात आले.

गोवा पोलिसांनी जलद अवयव वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था केली होती. त्यानुसार इंदूरला यकृत पोहोचवण्यासाठी दाबोळी विमानतळापर्यंत आणि हेल्थवे इस्पितळ व गोमेकॉत निर्धारित वेळेत मूत्रपिंड पोहाविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. त्यामुळे वेळेत अवयव पोहोचवणे शक्य झाले.