आकाशवाणी पणजीची एफएम रेनबो वाहिनी (105.4 एमएचझेड) ही शनिवार दि. 1 फेब्रुवारीपासून पुन्हा श्रोत्यांच्या सेवेत हजर होत आहे 5.53 पासून सकाळच्या प्रसारण सेवेतून रसिक श्रोत्यांसाठी मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम घेऊन आकाशवाणी पणजी येत आहे. अल्पशा विश्रांतीनंतर, एफएम रेनबो पणजी पुन्हा एकदा गोमंतक प्रदेशातील संगीत आणि मनोरंजनाचे सर्वोत्तम श्राव्य माध्यम बनण्यासाठी सज्ज झाले आहे. संगीताचे बहारदार कार्यक्रम, लाईव्ह फोन इन् कार्यक्रम, सुगम , शास्त्रीय आणि इतर सर्व लोकप्रिय संगीत शैलींसह कोकणी, हिंदी, इंग्रजी आणि मराठीमधील विविध संगीतमय कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी श्रोत्यांनी 105.4 एमएचझेडवर अवश्य वळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.