राज्यात झालेल्या जमीन घोटाळा प्रकरणातील एक प्रमुख आरोपी सुलेमान खान याचा एक साथीदार असिफ सौदागर याला काल जमीन घोटाळा प्रकरणाचे तपासकाम करणाऱ्या विशेष पोलीस पथकाने थिवी येथे अटक केली. असिफ चौदागर याच्यावर सुलेमान खान याच्या मदतीने थिवी-बार्देश येथील सर्वे क्रमांक 455/6, 466/6 या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून जमीन हडप केल्याचा आरोप आहे. असिफ सौदागर हा इंदिरानगर-करासवाडा येथील रहिवासी आहे.