सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 14 लाख रुपयांची फसवणूक

0
5

जुने गोव्यातील महिलेला अटक

आपेव्हाळ- प्रियोळ येथील गुरूदास गोविंद गावडे यांच्या दोन मुलांना सरकारी नोकरी देण्याचे अमिष दाखवून एकूण 14 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी पूजा नाईक (39, ओल्ड गोवा) या महिलेच्या विरोधात शनिवारी रात्री गुन्हा नोंद करत सदर संशयित महिलेला रविवारी अटक केली आहे. संशयीत महिलेने अनेकजणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून रक्कम घेतल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे.

गुरूदास गावडे यांच्या एका मुलाला कनिष्ठ अभियंत्याची नोकरी देण्यासाठी 10 लाख रुपये तर दुसऱ्या मुलाला एलडीसीची नोकरी देण्यासाठी 4 लाख रुपये संशयित महिलेने घेतले होते. काही वर्षांपूर्वी संशयित महिलेने रक्कम घेतली होती. पण अजूनपर्यंत नोकऱ्या दिल्या नसल्याने शनिवारी गुरूदास गावडे यांनी म्हार्दोळ पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दिली. त्यानुसार म्हार्दोळ पोलिसांनी रविवारी संशयित महिलेला अटक केली आहे.