भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे काल गोव्यात आगमन झाले. त्यांचे राजशिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्वागत केले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते पणजी येथे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. तसेच, सरन्यायाधीशांच्या हस्ते राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या ‘भारतीय पारंपरिक झाडे’ या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे.