सरकारी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विशेष मुलांच्या शाळांना शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या जाहिराती शिक्षण संचालनालयाच्या मीडिया पोर्टलवर प्रसिद्ध करणे बंधनकारक केले आहे. शिक्षण खात्याच्या मीडिया पोर्टलवर रिक्त जागांबाबत जाहिरात अपलोड न केल्यास अनुदानित शाळांच्या पदांना मान्यता नाही, असा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे.