कोलकाता या ठिकाणी असलेल्या आर. जी. कर महाविद्यालयात 9 ऑगस्टला एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला होता, त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. ट्रेनी डॉक्टरवर संजय रॉयनेच बलात्कार केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केली, असा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. ट्रेनी डॉक्टरवर सामूहिक बलात्काराची घटना घडलेली नाही, असेही त्यात म्हटले आहे.