दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर

0
2

भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या 17 व्या सोहळ्यात म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मिथुन चक्रवर्ती यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास पिढ्यांना प्रेरणा देतो. दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवडकर्त्या ज्युरींनी हा पुरस्कार भारतीय सिनेमातील विलक्षण योगदानाबद्दल मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्याचे ठरवले, हे जाहीर करताना अत्यंत अभिमान वाटतो आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.