हरियाणात काँग्रेस, आप युतीची शक्यता

0
9

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यातील युती जवळपास निश्चित झाली आहे. मात्र, त्याची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यात बैठक झाली होती. सोमवार दि. 9 सप्टेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पक्ष युतीची घोषणा करू शकतात. राज्यात आघाडीबाबत काँग्रेस-आप यांच्यात 3 बैठका झाल्या आहेत. काँग्रेसने एकूण 5 जागा ‘आप’ला देऊ केल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसने दोन यादीत 32 उमेदवार जाहीर केले आहेत. उरलेल्या 58 जागांपैकी ‘आप’ला 5 जागा मिळू शकतात.