माधवी पुरी यांच्यावर काँग्रेसचा मोठा आरोप

0
14

सेबी प्रमुख माधवी पुरी बुच ह्या काँग्रेसच्या निशाण्यावर आल्या असून, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माधवी यांनी सेबीशी संबंधित पदांवर असताना आयसीआयसीआय बँकेसह तीन ठिकाणांहून पगार घेतल्याचा आरोप केला. माधवी पुरी बुच ह्या सेबीच्या सदस्य आणि अध्यक्ष होत्या, तरीही त्यांनी आयसीआयसीआय बँकेकडून 16 कोटी रुपये पगार म्हणून घेतले. याबाबत बँकेने उत्तर दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. सेबी मार्केट रेग्युलटरी आणि अध्यक्ष यांची निवड पंतप्रधान आणि गृहमंत्री करतात. जेव्हा माधवी यांची निवड करण्यात आली, तेव्हा त्या सेबीसह आयसीआयसीआय बँक आणि आयसीआयसीआय प्रेड्युंशियल यांच्याकडून पगार घेत होत्या, असा आरोप खेरा यांनी केला.