राज्यात नवीन रोजगार संधींमध्ये घट : आलेमाव

0
7

राज्यात नवीन रोजगाराच्या संधींमध्ये घट झाली आहे. आयटीआयमधील अभ्यासक्रम आणि उद्योगांना आवश्यक मनुष्यवळ यांच्यात ताळमेळ नाही. आयटीआयमधील अभ्यासक्रम उद्योगांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाशी निगडीत असला पाहिजे. त्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी तयार होऊ शकतात, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल विधानसभेत सांगितले.