कांदोळीतील वृद्धाच्या खून प्रकरणी संशयितास कर्नाटकात ठोकल्या बेड्या

0
4

ओर्डा-कांदोळी येथील एरनॉल्ड सुवारिस (60) या वृद्धाच्या खून प्रकरणी कळंगुट पोलिसांनी संशयितास काल कर्नाटकात अटक केली. कर्नाटक पोलिसांच्या सहाय्याने त्याला अटक केली असून, त्याला गोव्यात आणण्यात येत आहे.

सविस्तर माहितीनुसार, ओर्डा-कांदोळी येथील एरनॉल्ड सुवारिस यांचा रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाने खून करून पळ काढला होता. खून केल्यानंतर संशयित त्यांची कार देखील पळवून नेली होती. नंतर ही कार सिकेरी येथील हेलिपॅडवर सापडली होती. सुवारिस यांचा खून केल्यानंतर संशयिताने कर्नाटकात पळ काढला होता. त्याच्या शोधासाठी कळंगुट पोलिसांचे एक पथक तयार करून ते कर्नाटकात पाठविण्यात आले होते. त्यानुसार कर्नाटक पोलिसांच्या मदतीने संशयिताला पकडण्यात कळंगुट पोलिसांना यश मिळाले.

कळंगुट पोलीस संशयिताला घेऊन गोव्यात येत आहेत. अद्याप पोलिसांनी संशयिताचे नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे ते समजू शकले नाही. गोव्यात संशयितास आणल्यावर त्याचे नाव, मूळ कुठचा, हत्या करण्यामागील कारण काय, हत्या कुणी व का करण्यास सांगितली, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.