‘पर्यटन’ विधेयक मसुदा आणखी 15 दिवस खुला

0
11

गोवा पर्यटन प्रोत्साहन, व्यवस्थापन आणि नियमन विधेयक, 2024 च्या मसुद्यावरील सूचना पाठविण्याची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली. पर्यटन खात्याने गोवा पर्यटन प्रोत्साहन, व्यवस्थापन आणि नियमन विधेयक, 2024 चा मसुदा सार्वजनिक सूचनांसाठी खुला केलेला आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रात गेल्या 40 ते 45 वर्षांत बदल झालेला आहे. त्यामुळे जुन्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी 33 बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर या विधेयकाचा मसुदा सूचनांसाठी खुला करण्यात आलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.