अज्ञात वाहनाने धडक दिल्याने करासवाडा येथे वृद्धाचा मृत्यू

0
9

कोलवाळ ते म्हापसा मार्गावरील करासवाडा औद्योगिक वसाहत ते करासवाडा चार रस्त्यामार्गे मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या विनायक धारगळकर (78, आकय करासवाडा म्हापसा) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने वाहनासह तेथून पलायन केले.

कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक धारगळकर हे नेहमीप्रमाणे कोलवाळ ते म्हापसा मार्गावरील कोलवाळ जलसिंचन खात्याच्या क्वाटर्सजवळून करासवाडा औद्योगिक वसाहतीकडून चार रस्त्याकडे आपल्या घराजवळ काल पहाटे 6.30 वा.च्या. मॉर्निगवॉकसाठी गेले असता एका अज्ञात वाहनाने त्यांना ठोकर दिल्याने ते खाली पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पुढील उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.