म्हादई प्रवाह समितीने केली ओपा, गांजे प्रकल्पांची पाहणी

0
13

म्हादई प्रवाह समितीच्या सदस्यांनी काल शुक्रवारी दुपारी आमोणा, बाणास्तारी, ओपा प्रकल्प व गांजे प्रकल्पांची पाहणी केली. त्यावेळी अध्यक्ष पी. एम. स्वाद यांच्या नेतृत्वाखाली जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी, कार्यकारी अभियंते शैलेश नाईक, अंकुश गावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
म्हादई नदीच्या पाणी वाटपासंदर्भात म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या सदस्यांनी पाहणी सुरू केली. म्हादई नदीपात्रामधील धरणे, पाणी प्रकल्प, जोड नद्या, उपनद्या, बंधारे यांची पाहणी केली. आज शनिवारी 6 रोजी महाराष्ट्रात तर उद्या 7 रोजी कर्नाटकातील प्रकल्पांची पाहणी करण्यात येणार आहे. सोमवारी बेंगलोर येथे बैठक होईल. या पाहणीचा अहवाल जलशक्ती मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे.