पोलीस चौकशीसाठी पुढची तारीख द्या ः पूजा शर्मा

0
8

आसगांव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर बेकायदेशीररित्या जमीनदोस्त करण्याच्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असलेल्या पूजा शर्मा हिने आपण आज 1 जुलै रोजी गुन्हा अन्वेषण विभागातील विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याचे कळवले असून हजर राहण्यासाठी आपणाला वेगळी पुढची तारीख द्यावी, अशी मागणी केली आहे.
हणजूण पोलिसांनी पूजा शर्मा हिला चौकशीसाठी 26 जूनला आपणासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. पण त्या दिवशी ती हजर राहू शकली नव्हती.