येथील हवामान विभागाने येत्या सोमवार दि. 8 ते बुधवार दि. 10 एप्रिल या दरम्यान राज्यातील काही भागात तुरळक पावसाची शक्यता काल व्यक्त केली. राज्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पणजीत गुरुवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि मुरगाव येथे 32.9 अंश सेल्सिअस नोंद झाले. येत्या 7 एप्रिलपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच, पुढील सात दिवस कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.